Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महामार्गावरील अपघाताने हळहळ; दुचाकीस्वार ठार, मुलीसह दोघांवर धुळ्यात उपचार सुरू
    क्राईम

    महामार्गावरील अपघाताने हळहळ; दुचाकीस्वार ठार, मुलीसह दोघांवर धुळ्यात उपचार सुरू

    editor deskBy editor deskJune 11, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    धुळे राष्ट्रीय महामार्गावरील दहिवद फाट्यावर भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर एका बालिकेसह अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. तर जखमींवर धुळे येथे उपचार सुरू आहेत.

    या अपघातात तालुक्यातील सेवानगर तांडा येथील चिमा तंगत धनगर (वय ४८) यांचा मृत्यू झाला असून हा अपघात १० जूनला दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, चिमा धनगर हे आपली मुलगी व साडूसह दुचाकी (एमएच १९, सीबी ३८५७) ने सेवानगर तांड्याकडे जात होते. दहिवद फाट्यावर महामार्ग ओलांडून दुचाकी वळवत असताना धुळ्याकडून चाळीसगावच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कार (एमएच ४८, एव्ही ५०३८) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती.

    की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये चिमा धनगर यांचा जागीच मृत्यू झाला. तर लहान मुलगी व अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव हे त्याच मार्गाने प्रवास करत असताना त्यांनी त्वरित महामार्ग प्राधिकरणाच्या आपत्कालीन सेवेशी संपर्क साधला. त्यानंतर काही वेळातच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली अन् जखमींना मदत देऊन पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले. ही माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस ठाण्याचे हवालदार दीपक महाजन तसेच पो.कॉ. प्रकाश कोळी व विश्वास देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अल्पभूधारक वृद्ध शेतकाऱ्याने संपविले आयुष्य !

    June 11, 2026

    भरधाव डंपरखाली चिरडून आजोबांचा मृत्यू !

    June 11, 2026

    ताडपत्री विक्रीच्या व्यवसायासाठी आलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू !

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.