Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील गुटखा तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई !
    क्राईम

    जळगावातील गुटखा तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई !

    editor deskBy editor deskJune 10, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला तब्बल २८ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला. या कारवाईत मालवाहू बोलेरो वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना ९ जून रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, जळगाव शहरातील महामार्गावरून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक केली जाणार आहे.

    या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके तसेच पोलीस कर्मचारी यांचे विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पथकाने अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान महामार्गावरील जिओ पेट्रोलपंप परिसरात सापळा रचला.

    दरम्यान, संशयित बोलेरो मालवाहू वाहन तेथे आल्यानंतर पोलिसांनी ते शिताफीने अडविले. वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीत वाहनाच्या मागील भागात महाराष्ट्र राज्यात विक्री, साठवणूक आणि वाहतुकीस प्रतिबंधित असलेल्या विमल सुगंधित गुटखा आणि पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला.

    पोलिसांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा केला. चौकशीत चालकाने आपले नाव जोगेंद्र भिका पाटील (रा. फुलपाट, ता. धरणगाव) असे सांगितले.

    कारवाईदरम्यान २१ लाख ८१ हजार ६०० रुपये किमतीच्या प्रतिबंधित विमल गुटखा व पानमसाल्याच्या ५८ गोण्या तसेच ७ लाख रुपये किमतीचे महिंद्रा बोलेरो मालवाहू वाहन (क्रमांक MH-19 CX-3280) असा एकूण २८ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२७/२०२६ नुसार अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि पोलीस कर्मचारी योगेश घुगे करीत आहेत.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे व त्यांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे जळगावात आयोजन; राज्यभरातील खेळाडूंची उपस्थिती !

    June 13, 2026

    देशाला हादरवणारी दुर्घटना! हवाई दलाचे विमान कोसळले, पाच वीर जवान शहीद

    June 13, 2026

    चेंदामेंदा झालेल्या ट्रकमधून चालकाला मृत्यूच्या दाढेतून खेचले बाहेर

    June 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.