जळगाव : प्रतिनिधी
अमळनेर येथील ढेकू रोडवरील जिजाऊ नगर येथील रहिवासी डॉ सुमित पाटील याच्या मोटरसायकलची उभ्या असलेल्या ट्रकला धडक लागून अपघात झाल्याची घटना ७ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास लखनऊ येथे घडली. उपचार घेताना ९ रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. डॉ सुमित पाटील हा सारबेटेकर प्रा आर एस पाटील यांचा मुलगा व जळगाव जिल्हा परिषदेचे अधिकारी डी एस पाटील यांचा पुतण्या आहे.
तो लखनऊ येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. ७ रोजी तो आपल्या मोटरसायकलने जेवायला जात असताना वळणावर एक ट्रक उभा होता. मागील टेल लॅम्प बंद असल्याने मोटरसायकल ट्रकवर धडकल्याने सुमित याच्या पोटाला मार लागला होता. उपचारसाठी त्याला लखनऊ येथे वेदांता हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. ९ रोजी सकाळी उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. त्याची अंत्ययात्रा १० रोजी सकाळी ११ वाजता जिजाऊ नगर ढेकू रोड येथून निघणार आहे.



