Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बॅरेकमध्ये जाण्यास सांगितल्याचा राग; कैद्याने पकडला रक्षकाचा कॉलर
    क्राईम

    बॅरेकमध्ये जाण्यास सांगितल्याचा राग; कैद्याने पकडला रक्षकाचा कॉलर

    editor deskBy editor deskJune 9, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्हा कारागृहात बॅरेकमध्ये जाण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका कैद्याने ऑन-ड्यूटी पोलीस रक्षकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ८ जून) दुपारच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पोलीस रक्षकाला मारहाण करण्यात आली असून त्यांच्या गणवेशाची दोन बटणे तुटली आहेत. या प्रकरणी संशयित कैदी सुनील यशवंत नन्नवरे याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ कारभारी मोटे (वय २६) हे जळगाव जिल्हा कारागृहात रक्षक म्हणून कार्यरत आहेत. दि. ८ जून रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत त्यांची कारागृहातील सर्कल क्रमांक ३ मध्ये ड्युटी होती. सकाळी ११ ते सव्वा अकरा वाजेच्या सुमारास बंदीवानांचा मोकळा वेळ संपल्यानंतर सर्व कैद्यांना आपापल्या बॅरेकमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. त्यावेळी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी आणि बंदीवान सुनील नन्नवरे हा सर्कल क्रमांक ३ मध्ये विनाकारण रेंगाळताना आढळून आला.

    पोलीस रक्षक काशिनाथ मोटे यांनी नन्नवरे याला त्याच्या निर्धारित सर्कल क्रमांक १ मधील बॅरेक क्रमांक ३ मध्ये जाण्यास सांगितले. मात्र, याचा राग आल्याने नन्नवरे याने मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने पोलीस रक्षकासोबत हुज्जत घालत वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त कैद्याने थेट पोलीस रक्षकाचा शर्टचा कॉलर पकडला आणि त्यांना चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कारागृह परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

    घटनेची माहिती मिळताच कारागृहातील इतर कर्मचारी पवन पंडित जाधव, कृष्णा शिंदे, भैय्यासाहेब पाईकराव आणि सुभेदार भारत काशिनाथ कर्पे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मध्यस्थी करत संतप्त कैद्याला आवर घातला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या हल्ल्यात पोलीस रक्षक काशिनाथ मोटे यांच्या खाकी शर्टची दोन बटणे तुटली असून शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

    घटनेनंतर वरिष्ठ तुरुंग अधीक्षकांना याबाबत तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा कारणास्तव आरोपी कैदी सुनील नन्नवरे याला दुसऱ्या विभक्त बॅरेकमध्ये हलविण्यात आले.  दरम्यान, पोलीस रक्षक काशिनाथ मोटे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सुनील यशवंत नन्नवरे याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ड्रग रॅकेट प्रकरणातील आरोपीवर बुलडोझर कारवाई; अनधिकृत दुकाने जमीनदोस्त

    June 9, 2026

    आजीच्या डोळ्यादेखत नातवाचा मृत्यू; विजेच्या धक्क्याने ९ वर्षीय मुलाचा अंत

    June 9, 2026

    अमळनेर तालुक्यातील मंगरूळजवळ भीषण तिहेरी अपघात!

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.