Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लघुशंकेच्या वादातून तरुणाचा खून; फरार प्रियकर-प्रेयसी मध्यप्रदेशातून जेरबंद
    क्राईम

    लघुशंकेच्या वादातून तरुणाचा खून; फरार प्रियकर-प्रेयसी मध्यप्रदेशातून जेरबंद

    editor deskBy editor deskJune 8, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    घरासमोर लघुशंका केल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातून राहुल संतोष वाघोदे (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणाच्या छातीत चॉपर भोसकून खून केल्याची घटना घडली होती. घटनेच्या दिवसापासून खून करणारे तरुण-तरुणी हे दोघ पसार झाले होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तपासचक्रे फिरवित तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने संशयित सुमित जितेंद्र लोखडे (वय, रा. वाघनगर) याच्यासह सोळा वर्षीय विधीसंघर्षीत मुलीला मध्यप्रदेशातून अटक केली.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील कोल्हे हिल्स परिसरात मद्यपान केल्यानंतर राहुल वाघोदे हा त्याचा मित्र नितीन सैनी व संशयित मारेकऱ्यांनी सोबत लोखंडी घरी जेवण केले. मद्याच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या राहुलने वाघोदे याच्या घरासमोर लघुशंका करीत होता. यावेळी सुमितच्या घरात राहत असलेली त्याची अल्पवयीन मैत्रीणने त्याला हटकून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुमितने देखील राहुला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी राहुलचे मित्र हर्षल आणि नितीन हे भांडण सोडवित असतांना घरातून धारदार चॉपर घेवून आलेल्या अल्पवयीन मुलीने राहुलच्या छातीत चॉपर भोसकला. दरम्यान, तो चॉपर छातीतच अडकून पडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या राहुलला त्याच्या मित्रांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या राहुल वाघोदे याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरु असताना दि. ३ जून रोजी त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात खूनाचे कलम वाढविण्यात आले होते.

    घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तालुका पोलीसांसह गुन्हे शोध पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हा घडल्यापासून फरार असलेल्या लोखंडेसह त्याच्या अल्पवयीन मैत्रणीचा कसून शोध घेतला जात होता. त्यांच्या शोधार्थ तालुका पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी दोन वेगवेगळी पथके मध्यप्रदेशात रवाना करण्यात आली होती. या पथकाने मध्यप्रदेशात तळ ठोकून होते.

    तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर संशयितांचा शोध सुरु असतांना दोघ संशयित हे मध्यप्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ कैलास इंगळे, अविनाश देवरे, प्रशांत ठाकूर, योगेश पाटील व महिला अंमलदार योगिता पाचपांडे यांचे पथकाने अल्पवयीन मुलीला मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथून तर संशयित सुमित लोखंडी याला सुरत जिल्ह्यातील उधना येथून ताब्यात घेतले. मुलीची आशादीप सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे तर संशयित लोखंडे याला अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    संसाराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग; दारूच्या पैशावरून पत्नीचा दुर्दैवी अंत

    July 26, 2026

    कामावरून घरी परतताना काळाचा घाला; जळगावात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    July 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.