जळगाव : प्रतिनिधी
गावठी कट्टुयाासह जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या आकाश कैलास दामोधर (वय २४, रा. न्यू फेडरेशन बिल्डींग, पिंप्राळा हुडको) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील प्रल्हाद नगरच्या कंपाऊंटमध्ये संशयित आकाश दामोधर हा गावठी कट्टा घेवून दहशत माजवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार दि. ५ जून रोजी सायंकाळी पथकाने सापळा रचून संशयित आकाश दामोधर याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गावठी कट्टयासह दोन जीवंत काडतूस काढून दिले पोलिसांनी ते जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल रगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित आकाश दामोधर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक संजय शेलार हे करीत आहे.



