Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘अनिकेत तटकरेंना उमेदवारी कशी मिळाली?’; पालकमंत्रिपदाच्या तडजोडीचा रोहित पवारांचा गौप्यस्फोट
    Uncategorized

    ‘अनिकेत तटकरेंना उमेदवारी कशी मिळाली?’; पालकमंत्रिपदाच्या तडजोडीचा रोहित पवारांचा गौप्यस्फोट

    editor deskBy editor deskJune 5, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडीवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याचा दावा केला आहे.

    गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बाळ माने यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग प्रशस्त झाला. महायुतीकडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या जागेवर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती.

    यावर भाष्य करताना रोहित पवार यांनी कोकणातील शिवसेना शिंदे गटातील अनेक नेते सुरुवातीला सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला विरोध करत होते, असा दावा केला. मात्र नंतर अचानक विरोध मावळल्याने पडद्यामागे काही राजकीय तडजोड झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

    “कोकणातील शिवसेना शिंदे गटाचे अनेक नेते सुनील तटकरे यांच्या विरोधात भूमिका घेत होते. ते तटकरे पक्षाला अडचणीत आणतात, असेच सांगत होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. मला वाटते, पालकमंत्रिपदासारख्या महत्त्वाच्या पदावरून काही तडजोड झाली असावी,” असा दावा रोहित पवार यांनी केला.

    यावेळी त्यांनी सुनील तटकरेंवरही जोरदार टीका केली. “जर कोणी सुनील तटकरे यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत असेल, तर ते वेगळ्याच स्वप्नात आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

    दरम्यान, सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांनी इतर पक्षांच्या राजकारणात लक्ष घालण्याऐवजी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली.

    “तुम्ही जिथे चुकाल, तिथे आम्ही बोलणारच. तुम्ही खूप कष्ट घेतल्याचा दावा करता, पण खरोखर कष्ट घेतले असते तर कोकणात घड्याळ पक्षाची एवढी वाताहत झाली नसती. तुम्ही जेव्हापासून कोकणातील राजकारणात सक्रिय झालात, तेव्हापासून पक्षापेक्षा स्वतःच्या कुटुंबाचा अधिक विचार केला. त्यामुळेच पक्षाचे मोठे नुकसान झाले,” असा घणाघाती आरोप रोहित पवार यांनी केला.

    कोकणातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीमागील राजकीय समीकरणे, महायुतीतील अंतर्गत तडजोडी आणि कोकणातील बदलती राजकीय परिस्थिती यावरून आगामी काळात वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तुकाराम मुंढेंचा धडाका! 3 दिवसांत 53 धाडी; 33 भेसळखोर तुरुंगात

    May 29, 2026

    पाळधी ते जळगाव सिमेंट रस्त्याची दोन महिन्यांतच दुरवस्था; ठेकेदाराचा अधिकाऱ्यांना ‘कोलदांडा’?

    May 24, 2026

    विधान परिषदेचा बिगुल! 17 जागांसाठी राजकीय रणसंग्राम सुरू

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.