Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तापी नदीपात्रात मुलाचा बुडून मृत्यू
    क्राईम

    तापी नदीपात्रात मुलाचा बुडून मृत्यू

    editor deskBy editor deskJune 3, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  प्रतिनिधी 

    तालुक्यातील विदगाव जवळील तापी नदीपात्रात बुडून एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यश अशोक भालेराव (१५, रा. किनगाव, ता. यावल) असे या मुलाचे नाव असून, पोलिसांकडून त्याची ओळख पटवण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  किनगाव येथील रहिवासी असलेला यश हा जळगाव शहरात एका वसतिगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण करत होता. सोमवारी तो जळगावहून आपल्या मामाच्या गावी किनगावला जाण्यासाठी निघाला होता. वाटेत विदगावजवळ तो आपल्या मित्रांसोबत तापी नदीच्या पात्रात उतरला. मात्र, हे धाडस त्याच्या जीवावर बेतले.

    स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा काहीसा गतिमंद होता तसेच त्याची दृष्टीही अधू होती. त्यामुळे नदीपात्रात खेळत असताना त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. बघता बघता तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने नदीकडे धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर यशचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे. यशला दोन भाऊ असून त्याची आई बाहेरगावी राहते. तो जळगावहून किनगावला मामाच्या गावी एकटाच ये-जा करत असायचा, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळ हादरले : पूर्ववैमनस्यातून बेदम मारहाण; २६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

    June 3, 2026

    १२ वर्षीय गणेशच्या मृत्यूला नवे वळण; तब्बल २ महिने २० दिवसांनी सांगाडा बाहेर काढला!

    June 3, 2026

    जिल्ह्यातील भाजप राजकारणाला कलाटणी देणाऱ्या विधान परिषद निवडणुकांचा इतिहास!

    June 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.