Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रुद्राक्षाचा चमत्कार दाखवत वृद्धाला लुबाडले;भोंदूंची जळगाव बसस्थानकात करामत
    क्राईम

    रुद्राक्षाचा चमत्कार दाखवत वृद्धाला लुबाडले;भोंदूंची जळगाव बसस्थानकात करामत

    editor deskBy editor deskApril 23, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तुमचा शनि काढून देतो’ असे सांगत गजानन विठोबा सर्जेराव (वय ६७, रा. जिल्हा बँक कॉलनी) या वृद्धाची सोन्याची अंगठी व रोख ९०० रुपये अज्ञाताने त्यानंतर हा अज्ञात भोंदू त्याच्या साथीदारासह पसार झाला. हा प्रकार दि. २० एप्रिल रोजी नवीन बसस्थानकात घडला. या प्रकरणी लांबविले. २१ एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  जिल्हा बँक कॉलनीतील रहिवासी गजानन सर्जेराव हे त्यांच्या मुलीकडे घरभरणीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी बसस्थानकावर आले होते. त्यांच्याजवळ एक जण आला व त्याने शेगावच्या बसविषयी विचारणा केली. त्यावर वृद्धाने माहिती नसल्याचे सांगितले. त्यावेळी समोरील व्यक्तीने वृद्धाच्या शेजारी बसलेल्या इसमाला एक खडा आणण्यास सांगितला व तो वृद्धाच्या हातात दिला. त्यानंतर तीन वेळा राम-राम म्हणण्यास सांगितले. नंतर बंद मूठ उघडली असता त्या खड्याच्या जागी रुद्राक्ष दिसला.

    खड्याच्या जागी रुद्राक्ष दिसल्यानंतर अनोळखी व्यक्तीने वृद्धासह त्याच्या शेजारील व्यक्तीला बंद पोलिस चौकीच्या बाजूला नेले. त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीचे कडे काढण्यास सांगितले व वृद्धाला त्याच्या बोटातील सोन्याची अंगठी व खिशातील पैसे कडेवाल्या व्यक्तीकडे देण्यास सांगितले. त्यानंतर दोघांनाही पुढे चालण्यास सांगितले. नंतर वृद्ध पुन्हा मागे परतले त्यावेळी दोन्हीही अनोळखी इसम गायब झाले होते. दोघांनी संगनमत करून फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धाने २१ एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक राजेश पदमर करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026

    जुन्या घरगुती वादातून तरुणावर कुऱ्हाडीसह विळ्याने वार !

    April 23, 2026

    चुंचाळेत बेकायदेशीर बियाणे विक्री उघड; एक आरोपी गजाआड

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.