जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शाळेच्या परिसरात विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील एका शाळेच्या परिसरात दिनांक 30 मार्च रोजी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी पेपर देण्यासाठी आली असता या ठिकाणी 38 वर्षीय नितीन नामक व्यक्तीने त्या मुलीचा पाठलाग करत तू कोणाबरोबर बोलायचे नाही तू फक्त माझी आहे, असे म्हणून तीस जवळ ओढून घेऊन तिच्या मनात लज्जा निर्माण होईल. असे कृत्य केल्याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात जामनेर पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी विरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



