जळगाव : प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील एकरुखी शिवारात १५ एप्रिल रोजी दुपारी १च्या सुमारास महावितरणच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांच्या शार्ट सर्कीट मुळे सुमारे सहा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे व गट नंबर पुढील प्रमाणे १)भीमसिंग पन्ना जाधव यांच्या शेतात मका पिक होते क्षेत्र 0.89 आर गट. नं. ११६/३ब २)हिम्मत पन्ना जाधव यांच्या शेतात बाजरी पिक होते क्षेत्र 0.89 आर गट नं. ११६/३ब ३)दिपक बळवंत जाधव यांच्या शेतात मका क्षेत्र १.७८ आर गट नं.११६/३ब ४)कादरका मेवाती यांच्या शेतात मका क्षेत्र १.२० आर गट नं.११७ ५) कदरखा मेवाती यांच्या शेतात मका क्षेत्र १.२०आर गट नं.११७ ६) शकीलखा मेवाती यांच्या शेतातील ठिबक नळ्या पाईप गट नंबर ११७ या सर्व शेती क्षेत्रातील पिक,ठिबक नळ्या, पाईप व शेत उपयोगी साहित्य जळून राख झाले आहे.ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या शेत शिवारा लगत असलेल्या ढेकु तांडा येथील वस्तीला वाऱ्याच्या वेगामुळे आगीचा धोका निर्माण झाला होता परंतु येथील ग्रामस्थांनी एकजुटीने सर्वांनी प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली या वेळी अमळनेर नगरपालिका अग्निशामक दलाने घटनास्थळी वेळेवर दाखल होऊन सहकार्य केले व पुढील अनर्थ टळला.
या घटनेची माहिती महसूल व कृषी विभाग यांना देण्यात आली.या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच दिवशी नुकसान ग्रस्त शेती पिकांचे व शेती साहित्यांचा पंचनामा करण्यात आला त्यावेळी तलाठी गुलाबसिंग पावरा, कृषीसहाय्यक राजेंद्र पाटील तसेच भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हासरचिटणीस किरणभाऊ जाधव, पोलीस पाटील देशमुख पवार व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.



