Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नाशिक भोंदूबाबा प्रकरणाला नवे वळण; अंजली दमानिया यांचा आयजी दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप !
    राजकारण

    नाशिक भोंदूबाबा प्रकरणाला नवे वळण; अंजली दमानिया यांचा आयजी दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप !

    editor deskBy editor deskApril 14, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    भोंदूबाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले असून, यामध्ये पोलिस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. या नव्या खुलाशामुळे संपूर्ण प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे.

    दमानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कराळे हे अशोक खरात यांच्या कार्यक्रमात उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतक्या वरिष्ठ पदावरील पोलिस अधिकारी अशा वादग्रस्त व्यक्तीच्या कार्यक्रमात का सहभागी झाले, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, त्यांनी त्या कार्यक्रमात भाषणही केल्याचे सांगत यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.

    याचबरोबर दमानिया यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटले की, कराळे यांच्या कॉल रेकॉर्डमध्ये संशयास्पद बाबी समोर आल्या असून अशोक खरात यांच्याशी संबंधित सुमारे १८ कॉल्सचा उल्लेख आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी विभागीय व्हिजिलन्समार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, पोलीस महासंचालकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून जबाबदारी निश्चित करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    दरम्यान, या प्रकरणात यापूर्वीही अनेक धक्कादायक घडामोडी समोर आल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे विविध स्तरांपर्यंत पसरले असल्याचे स्पष्ट होत आहे.

    अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देखील या प्रकरणात मोठी कारवाई करत नाशिक, पुणे आणि शिर्डी परिसरात एकाचवेळी छापेमारी केली. या कारवाईत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे पुरावे हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका ठिकाणावरून मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, अशोक खरात यांच्या बँक खात्यातील सुमारे अडीच कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. याशिवाय एक आलिशान कारही जप्त करण्यात आली आहे.

    सध्या या प्रकरणामुळे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पत्नीसमोरच तरुणाची हत्या; जुन्या वैमनस्यातून हल्ला, सहा आरोपी अटकेत !

    April 14, 2026

    मनपाच्या महासभेत व्हीसीव्दारे उपस्थित राहण्याची परवानगी द्या ; वैशाली पाटील यांची मागणी !

    April 14, 2026

    कल्याण महामार्गावर मृत्यूचा थरार; भीषण धडकेत 11 जणांचा जागीच अंत

    April 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.