Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भुसावळ विभागात ‘फोर्ट्रेस’ मोहीम; ६०१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई, ४.३० लाखांचा दंड वसूल
    क्राईम

    भुसावळ विभागात ‘फोर्ट्रेस’ मोहीम; ६०१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई, ४.३० लाखांचा दंड वसूल

    editor deskBy editor deskApril 12, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ‘फोर्ट्रेस तिकीट तपासणी अभियान’ राबविण्यात आले. त्यात ६०१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यात चार लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या विशेष अभियानांतर्गत विभागातील भुसावळ, जळगाव, नाशिकरोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती या आठ प्रमुख स्थानकांवर एकाच वेळी तपासणी मोहीम राबविण्यात आली.

    या मोहिमेत एकूण ६० तिकीट तपासणी कर्मचारी आणि ९ रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले होते. अभियानादरम्यान मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. एकूण ६०१ प्रकरणांमध्ये विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून ४,३०,३३० इतका दंड वसूल करण्यात आला. याशिवाय रेल्वे कायद्याच्या कलम १४५ (बी) व १६७ अंतर्गत १७प्रकरणे नोंदवून त्यातून २,५०० इतका आकारण्यात दंड आला. तसेच स्थानक परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. अशा १२ विक्रेत्यांविरुद्ध नियमानुसार प्रकरणे दाखल करून रेल्वे प्रशासनाने शिस्तीचा संदेश दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आयटी क्षेत्रातील तरुणीचा गंभीर आरोप; फसवणूक, अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरणी तपासाची मागणी !

    April 12, 2026

    वेगवेगळ्या राज्यांचे पत्ते, पेमेंट रोखून फसवणूक; ‘रेझॉरपे’ व्यवहारातून प्रकार उघड

    April 12, 2026

    डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त जळगाव शहरात वाहतूक बदल !

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.