Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुरु-शिष्य नात्याला काळिमा : शिक्षकानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार !
    क्राईम

    गुरु-शिष्य नात्याला काळिमा : शिक्षकानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार !

    editor deskBy editor deskApril 9, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगांव : प्रतिनिधी 

    फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तीन वर्षांपासून शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करीत गुरु-शिष्य नात्याला काळिमा फासणारी घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित राहुल जगन्नाथ अहिरे (रा. अमळनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली.

    मिळालेल्या माहितीनुसार,  पीडित मुलगी ही धरणगाव शहरात वास्तव्यास असून तीन वर्षांपासून म्हणजेच २०२२ मध्ये एका शाळेत शिकत होती. त्यावेळी राहुल अहिरे हा त्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते, परंतु त्याचा पीडितेच्या वर्गाशी काहीही एक संबंध नव्हता. परंतु तरी देखील तो पीडितेच्या वर्गाजवळ येवून तिला अश्लिल इशारे करीत अंगलट करण्याचा प्रयत्न करीत होता. पीडितेने याप्रकाराबाबत वाच्यता केल्यास तिच्या कुटुंबियांसह तिच्या भावाला मारुन टाकण्याची देखील धमकी देत होता. तसेच पीडितेचा पिछा करीत होता, तिच्या घरापर्यंत देखील पोहचला होता.

    पीडितेची आई आणि लहान मुलगी हे वरच्या घरात झोपलेले असतांना, संशयित नराधम शिक्षक राहुल अहिरे हा त्यांच्या घरात शिरला. पीडितेच्या आईने त्याला बघितल्यानंतर त्याने खिडकीतून उडी मारल्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळेस त्याला मारहाण केली होती, परंतु त्याने माफी मागितल्यामुळे याबाबत तक्रार दाखल केली नव्हती. नैराश्यात असलेल्या पीडितेवर उपचार सुरु असतांना तीला बरे वाटल्यानंतर पीडितेच्या आईने दि. ७ एप्रिल रोजी धरणगाव पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित राहुल जगन्नाथ अहिरे यांच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

    संशयित शिक्षक राहुल अहिरे याने पीडितेचे गुपचूप फोटो काढून ठेवले होते. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो पीडितेकडे वारंवार शरिरसुखाची मागणी करीत होता. तसेच तिला अश्लिल व्हिडीओ देखील पाठवित होता. यासंपुर्ण प्रकारामुळे पीडिता नैराश्यात गेल्यामुळे तिच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर देखील संशयित याने डिसेंबर २०२५ मध्ये नवीन आयडी तयार करुन तिच्याक डे शरिरसुखाची मागणी करीत होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो’ : वाढदिवसाला न बोलविल्याने संपविले आयुष्य !

    April 9, 2026

    धक्कादायक! शाळेबाहेरील गैरकृत्यांमुळे ‘त्या’ शिक्षकावर गाजले निलंबन !

    April 9, 2026

    पाहुणी बनून घरात शिरली, विश्वासघात करून दागिने लंपास; ९७ हजारांची चोरी !

    April 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.