Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विधानपरिषद निवडणूक: पवारांचा मोठा निर्णय; आघाडीची एकमेव जागा ठाकरे गटाला देण्याचे संकेत
    राजकारण

    विधानपरिषद निवडणूक: पवारांचा मोठा निर्णय; आघाडीची एकमेव जागा ठाकरे गटाला देण्याचे संकेत

    editor deskBy editor deskApril 4, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत महत्त्वाच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना दिलेल्या पाठिंब्यानंतर आता त्याची परतफेड करण्याची भूमिका पवार यांनी स्पष्ट केली आहे.

    पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी सांगितले की, विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे जे नाव सुचवतील, त्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील एकमेव जागा ठाकरे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

    राज्यात विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार असून, विद्यमान संख्याबळानुसार महायुतीला ८ आणि महाविकास आघाडीला केवळ १ जागा मिळण्याचा अंदाज आहे. या एका जागेसाठी महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र, शरद पवार यांच्या भूमिकेमुळे या जागेवरचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

    पवार यांनी पुढे सांगितले की, महाविकास आघाडीतील सर्व निर्णय सामूहिक पद्धतीने घेतले जातील आणि कोणत्याही पक्षाला कमी लेखले जाणार नाही. त्यामुळे आघाडीतील एकजूट कायम ठेवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

    दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत असल्याने ते स्वतः निवडणूक लढवणार की एखाद्या विश्वासू सहकाऱ्याला संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    विधानपरिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. यामध्ये विविध पक्षांच्या सदस्यांचा समावेश असून, या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नांदेडमध्ये मध्यरात्री गँगवॉर; रुग्णालयातही हल्ला, तिघांचा खून !

    April 4, 2026

    दिंडोरीत भीषण दुर्घटना; कार विहिरीत कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाच कुटुंबावर काळाचा घाला

    April 4, 2026

    बुरखा घालून ज्वेलरी दुकानात दरोडा; ‘खेळण्याच्या पिस्तुलाने’ 3.6 लाखांचे सोनं लंपास : प्रेमीयुगुल अटकेत

    April 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.