Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सिक्युरिटी इन्चार्जने सिक्युरिटी गार्ड महिलेवर केला अत्याचार !
    क्राईम

    सिक्युरिटी इन्चार्जने सिक्युरिटी गार्ड महिलेवर केला अत्याचार !

    editor deskBy editor deskApril 4, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    बांभोरी येथील एका कंपनीतील सिक्युरिटी इन्चार्जने सिक्युरिटी गार्ड महिलेवर अत्याचार करून तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांना माहिती दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पाळधी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, येथून जवळच असलेल्या बांभोरी येथील एका कंपनीत जळगाव शहरात वास्तव्यास असलेली एक महिला सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२५ मध्ये मुलगी आजारी असल्याने तिच्या देखभालीसाठी या महिलेस २ दिवसांची सुट्टी हवी होती. त्यासाठी ती महिला सिक्युरिटी इन्चार्ज जनार्दन (पूर्ण नाव माहित नाही) यांना सुट्टीचा अर्ज देण्यासाठी गेली असता त्याने तिला तू मला फार आवडते, तू मला खुश कर, मी तुला सुट्टी देतो आणि तिचा पगार कापणार नाही, असे सांगून त्यांच्याशी अंगलगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या महिलेवर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच या प्रकरणाची वाच्यता कोठे केली, तर तुझा कुटुंबाला जीवे ठार मारेल, अशी धमकी दिली होती.

    यानंतर त्याने २१ मार्चला कंपनीत नवीन आलेल्या मुलींना माझ्याकडे पाठवून मला खुश कर, असे सांगितले. या कामाला त्या महिलेने नकार दिल्याने त्याने २३ मार्चला एका सहकारी महिलेला हाताशी धरुन मोबाईलवरून त्यांच्याशी भांडण केले. याबाबत जास्तच त्रास होत असल्याने त्या महिलेने कुटुंबीयांशी चर्चा केली. तर कुटुंबीयांनी त्यांना धीर दिला. त्यानंतर पाळधी पोलिसांत त्या महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत पाळधी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास हे.कॉ. प्रवीण तांदळे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दिंडोरीत भीषण दुर्घटना; कार विहिरीत कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाच कुटुंबावर काळाचा घाला

    April 4, 2026

    अमळनेरमध्ये ‘मृत्यूचा गतिरोधक’ : उंच स्पीड ब्रेकरमुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू; नागरिकांत संताप

    April 4, 2026

    भुसावळ शहरात गावठी पिस्तुलसह आरोपी ताब्यात; पोलिसांनी घेतली कारवाई

    April 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.