Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव पुन्हा हादरले, डोक्यामध्ये रोड टाकून तरुणाचा खून !
    क्राईम

    जळगाव पुन्हा हादरले, डोक्यामध्ये रोड टाकून तरुणाचा खून !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 23, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील खुनाचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. दोन दिवसापूर्वी शाहूनगरातील जळकी मील भागात खून झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा हरीविठ्ठल नगर परिसरात एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने काही मिनिटात एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    जळगाव जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून दर आठवड्याला कुठे ना कुठे खून झाल्याची घटना कानावर येत आहे. दोन दिवसांपूर्वी गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरुणाचा जळकी मिल रेल्वे ट्रॅकजवळ खून करण्यात आला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली आहे.

    शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास हरिविठ्ठल नगर परिसरातील गणपती मंदिर बाजार पट्टा परिसरात लोखंडी रॉडने दिनेश भोई याच्या डोक्यावर वार करण्यात आले. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार सुरू असताना रात्री ९.३० च्या सुमारास मृत्यू झाला.

    घटनेची माहिती कळताच एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाव घेतली. संशयित विठ्ठल माऊली हटकर हा एका ठिकाणी लपला असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. एलसीबीचे विजय पाटील, प्रितम पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख यांनी विठ्ठल हटकर याळ ताब्यात घेतले.

    घटनास्थळी गर्दी जमल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून रॉड हस्तगत केला आहे. जिल्हा रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. वैयक्तिक वाद आणि जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याचे समजते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026

    जळगावात खान्देश महोत्सव २०२६ – स्थानिक महिला व उद्योजकांचा रंगीबेरंगी उत्सव!

    February 20, 2026

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.