Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भीषण अपघातात १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपड्यात शोककळा !
    क्राईम

    भीषण अपघातात १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपड्यात शोककळा !

    editor deskBy editor deskMarch 30, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    शहरात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्कर्ष दिलीप पाटील (वय १६, रा. बोरोले नगर, चोपडा) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, २६ मार्च रोजी प्रताप हायस्कूलजवळ उत्कर्षचा गंभीर अपघात झाला होता. अपघातानंतर त्याला तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात येत होते. मात्र, रस्त्यातच त्याच्या शरीरातील हालचाल बंद झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. यानंतर त्याला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ड्युटीवरील वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना पाटील यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज वाळुंज करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बोदवडमध्ये जमीन प्रकरण पेटले; एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध गुन्हा दाखल

    March 30, 2026

    ‘इस्रो शास्त्रज्ञ’ बनून महिलांची फसवणूक; २१ वर्षीय तरुणाचा भंडाफोड !

    March 30, 2026

    कोल्हे हिल्स परिसर चोरट्यांचा धुमाकूळ : लाखोंचा मुद्देमाल लंपास !

    March 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.