Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गॅरेज चालकावर मारहाण : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
    क्राईम

    गॅरेज चालकावर मारहाण : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskMarch 30, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील जुन्या कोंडवाडा परिसरात किरकोळ वादातून गॅरेज चालकावर मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी सहा जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिरोज शेख याकूब (वय ३६, रा. जाम मोहल्ला) हे खडका चौफुलीजवळ ‘सिकंदर कार’ नावाचे गॅरेज चालवतात. २७मार्च रोजी कुटुंबीयांच्या कार्यक्रमानिमित्त ते मुस्लिम कॉलनी येथे गेले असताना रात्री सुमारास गाणे लावण्याच्या कारणावरून काही युवकांमध्ये वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी फिरोज शेख घटनास्थळी गेले. त्यानंतर रात्री १०.४५ वाजता चिराग हॉलजवळील मैदानावर चर्चा करण्यासाठी गेले असता, तेथे उपस्थित काही जणांनी एकत्र येत त्यांच्यावर शिवीगाळ करत चापटा व बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी मोहसीन, आमीर, राजा तसलीम उर्फ राजा पहेलवान, साजीद लाला, चाहत किन्नर व मोहम्मद इसराइल उर्फ गोलू (सर्व रा. भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे जळगावात आयोजन; राज्यभरातील खेळाडूंची उपस्थिती !

    June 13, 2026

    देशाला हादरवणारी दुर्घटना! हवाई दलाचे विमान कोसळले, पाच वीर जवान शहीद

    June 13, 2026

    चेंदामेंदा झालेल्या ट्रकमधून चालकाला मृत्यूच्या दाढेतून खेचले बाहेर

    June 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.