Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महसूल विभागात खळबळ : पाच हजाराची लाच घेताना तलाठी अटकेत
    क्राईम

    महसूल विभागात खळबळ : पाच हजाराची लाच घेताना तलाठी अटकेत

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 26, 2026Updated:March 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जमीन खरेदीची नोंद करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून जळगाव तालुक्यातील करंजा सजातील तलाठी अजय बिडवे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावाने हद्दीत शेती जमीन खरेदी केली होती. त्या खरेदीची नोंद संबंधित क्षेत्रात करण्यासाठी तलाठी अजय बिडवे यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

    याबाबत तक्रारदाराने २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता तलाठी बिडवे यांनी जमीन खरेदी नोंद लावण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    तक्रारदाराने लाच देण्यासाठी गेल्याचा संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नाही. मात्र लाच मागितल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्मिता नवरे तसेच पो.नि. हेमंत नागरे, पोउनि. दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ. संगीता पवार
    पोना. बाबू मराठे, पोका. अमोल सूर्यवंशी, पोका. गणेश ठाकूर यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे महसूल विभागातील कामकाजातील पारदर्शकतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026

    सराईत गुन्हेगाराची दहशत अखेर उघड; पोलिसांनी काढली धिंड !

    March 26, 2026

    ४ हजार रुपयांच्या वादातून संघर्ष; भुसावळात दोन जणांविरुद्ध गुन्हा

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.