Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भोंदू बाबा प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक; “मला बदनाम करण्यामागे भाजपचा अजेंडा”
    क्राईम

    भोंदू बाबा प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक; “मला बदनाम करण्यामागे भाजपचा अजेंडा”

    editor deskBy editor deskMarch 25, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी नाव जोडले गेल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वतःवरील आरोप फेटाळून लावत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले असून, “मला बदनाम करण्याचा कट भाजपच्या कार्यालयातून राबवला जात आहे,” असा दावा त्यांनी केला.

    अशोक खरात आणि बच्चू कडू यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये खरात कडू यांच्या कानात काहीतरी सांगताना तसेच “तुम्ही भाजपमध्ये मंत्री असताना इथे या” असे बोलताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर कडू यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

    कडू म्हणाले की, “आम्हाला कार्यकर्त्यांनी एका महादेव मंदिरात नेले होते. तिथे हा बाबा उपस्थित होता. त्याने माझा सत्कार केला. तो वयाने मोठा असल्याने भारतीय संस्कृतीनुसार मी त्याच्या पाया पडलो. मात्र, तो बाबा चुकीचा आहे हे आम्हालाही माहित आहे. अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेधच करतो.”

    यावेळी कडू यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर थेट निशाणा साधला. “याच अशोक खरातला भेटायला अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि इतर नेते गेले होते. त्यांना कोणी जाब विचारला का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

    पुढे त्यांनी पंतप्रधानांचा उल्लेख करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. “नरेंद्र मोदी हेही एकेकाळी आसाराम बापू यांच्या भेटीला गेले होते. मग त्यांच्यावरही कारवाई करणार का? कोणासोबत फोटो असला म्हणजे तो माणूस आरोपी होत नाही,” असे कडू म्हणाले. कडू यांनी पुढे आरोप केला की, “भाजप ठरवते कोणाच्या सीडी बाहेर काढायच्या आणि कोणाला बदनाम करायचे. मी गरीब आहे म्हणून मला लक्ष्य केले जात आहे.” दरम्यान, अशोक खरात याच्यावर लागलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.