Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे महागाईविरोधात आंदोलन
    जळगाव

    जळगावात राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे महागाईविरोधात आंदोलन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 21, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- केंद्र सरकारने गॅससह पेट्रोल-डीझेल, खाद्य तेल आदींची दरवाढ केली आहे. या महागाईविरोधात आज जळगावमधील टॉवर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

    यावेळी गॅस सिलेंडरला हार चढवून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गॅस दर वाढ विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकारने अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले होते. मात्र, अच्छे दिन न येत महागाईत वाढ झाली असल्याचा आरोप महिला आघाडी महानगरध्यक्षा मंगला पाटील यांनी केला. गॅससह पेट्रोल-डीझेल, खाद्य तेल आदींची दरवाढ मागे घेतली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी पुढे सांगितले.

    यानंतर टाॅवर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, युवती अध्यक्ष कल्पिता पाटील, वाय. एस . महाजन, सलीम इनामदार, उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, विलास पाटील, राजू मोरे, आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू..

    April 11, 2026

    मराठवाडा पुन्हा हादरला : हिंगोलीत 4.7 तीव्रतेचा भूकंप; नागरिकांत भीती !

    April 11, 2026

    चांदी पॉलीशच्या बहाण्याने फसवणूक; सतर्क तरुणामुळे तिघे भामटे जाळ्यात

    April 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.