Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » छोट्या भावाचा धाडसी निर्णय; भावजयीशी विवाह करून पुतण्यांना दिले वडिलांचे छत्र !
    क्राईम

    छोट्या भावाचा धाडसी निर्णय; भावजयीशी विवाह करून पुतण्यांना दिले वडिलांचे छत्र !

    editor deskBy editor deskMarch 23, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नांदेड : वृत्तसंस्था

    जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक अभिमानास्पद घटना समाजात चर्चेचा विषय ठरली आहे. मोठ्या भावाच्या अकाली निधनानंतर, छोट्या भावाने आपल्या भावजयीशी विवाह करून उघड्यावर पडलेल्या भावाच्या मुलांच्या डोक्यावर पुन्हा पितृछत्र ठेवले. प्रफुल्ल पाटील या तरुणाने या धाडसी निर्णयाद्वारे कुटुंबातील नातेसंबंध, माणुसकी आणि जबाबदारी यांचे उत्तम उदाहरण साकारले आहे.

    किनवट तालुक्यातील वझरा (बु.) येथील अष्टपाल पाटील यांचे गत महिन्यात प्रदिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी आणि दोन लहान मुलं — ८ वर्षीय मुलगी व ६ वर्षीय अंध मुलगा — अचानक उघड्यावर पडले. वडिलांचे छत्र हरवल्याने संपूर्ण कुटुंब संकटात आले. भाकऱ्याच्या या दुर्दशेचे निराकरण करण्यासाठी धाकटा भाऊ प्रफुल्ल पाटील यांनी आपल्या भावजयीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा प्रस्ताव कुटुंबीयांना मांडला आणि विजयालक्ष्मी यांच्यासह सर्वांचे सहमती मिळवून हा विवाह एका छोटेखानी कार्यक्रमात पार पडला.

    ऑटोचालक व्यवसाय करणारा प्रफुल्ल पाटील म्हणतो, “माझ्या भावाच्या पश्चात ही मुले अनाथ होऊ नयेत, तसेच वहिनी समाजात सन्मानाने जगता यावी, हा माझा उद्देश होता. ही फक्त माझी जबाबदारी नाही, तर भावाप्रती माझे कर्तव्यही आहे.” आर्थिक परिस्थिती सामान्य असतानाही, प्रफुल्लने वैयक्तिक सुखाऐवजी पुतण्यांच्या भवितव्यास प्राधान्य दिले.

    या विवाहामुळे उघड्यावर पडलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले आहे आणि मुलांना वडिलांचे प्रेम मिळाले आहे. प्रफुल्लच्या या कृतीमुळे समाजात माणुसकी, कर्तव्यपरायणता आणि नातेसंबंधांची जपणूक किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट झाले. स्थानिक ग्रामस्थ या निर्णयाचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शिवसेना-भाजपमध्ये तणाव टोकाला, मंत्री-आमदारांनी राजीनाम्याचा इशारा दिला !

    March 23, 2026

    भोंदू अशोक खरात प्रकरणातील मंत्र्यांना सहआरोपी करा ; वडेट्टीवार आक्रमक !

    March 23, 2026

    भडगावात ड्रग्जचा धक्का : कारमधून १० पुडी MD जप्त, महिला सहित दोघे ताब्यात

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.