Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुढीपाडव्याला फडणवीसांचा मोठा संकल्प; “महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडवणार!”
    जळगाव

    गुढीपाडव्याला फडणवीसांचा मोठा संकल्प; “महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडवणार!”

    editor deskBy editor deskMarch 19, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था

    “महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून राज्याला पुढे नेणे, हाच आपल्या नव्या वर्षाचा संकल्प आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने केले.

    गुढीपाडवा निमित्त नागपुरात आयोजित भव्य शोभायात्रेत सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. आधुनिकतेसोबतच प्राचीन परंपरा, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा हा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नरेंद्र मोदी यांनीही ‘विकास आणि विरासत’ या संकल्पनेवर भर दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.

    दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजीनामा प्रकरणामुळे नाराज असल्याचे म्हटले जात असलेले आमदार संदीप जोशी यांची नाराजी दूर झाल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. संदीप जोशी आणि मित्रपरिवारातर्फे दरवर्षी या शोभायात्रेचे आयोजन केले जाते आणि आपण दरवर्षी यात सहभागी होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागपूर शहर भगव्या रंगात रंगलेले पाहायला मिळाले. नववर्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्याचे सांगत, हे वर्ष चांगले जावे यासाठी सरकार कटिबद्ध असून भगवंताच्या कृपेने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अवकाळी गारपीटचा प्रचंड फटका : द्राक्ष, आंबा, काजू आणि केळी पिके धोक्यात

    March 19, 2026

    बारामतीत आघाडीची फूट? काँग्रेसचा इशारा; पवार गटावर थेट दबाव

    March 19, 2026

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.