Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले
    अमळनेर

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    editor deskBy editor deskMarch 13, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    शहरात येणाऱ्या गांजाला बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध घातला असला तरी अनेक तरुण गांजा सेवन करून उद्ध्वस्त होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे राहुल गायकवाड व अमळनेरचे पो.नि. दत्तात्रय निकम यांनी संयुक्त कारवाई करत चार वेगवेगळ्या ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

    अमळनेर शहरात तरुण गांजा सेवनाकडे वळले असून भविष्यात गुन्हेगारीकडे वळतील, त्यामुळे वेळीच त्यांना आवर घालणे गरजेचे असल्याने एलसीबी व अमळनेर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त मोहीम राबवली. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एलसीबी निरीक्षक राहुल गायकवाड यांनी त्यांचे कर्मचारी प्रवीण मांडोळे, संदीप पाटील, तर अमळनेर पोलीस स्टेशनचे पो.नि. दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हे. कॉ. मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, नितीन मनोरे, उदय बोरसे, नीलेश मोरे, उज्ज्वलकुमार म्हस्के, नितीन कापडणे यांना ११ रोजी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारायला पाठवले. यात मारवड रस्त्यावर उड्डाणपुलाखाली राजेश चुडामन कोईकर (वय २१, रा. बंगाली फाईल) हा तरुण चिलीममध्ये गांजा भरून सेवन करताना आढळून आला.

    दुसरीकडे इंदिरा भवनमागे मोकळ्या जागेत आदिल आबीद शेख (वय २५, रा, माळीवाडा, बहादरपूर रोड) हा देखील गांजा सेवन करताना आढळला. तिसऱ्या ठिकाणी रेल्वे स्टेशन बाहेर पाण्याच्या टाकीजवळ नीलेश महेंद्र पाटील (वय २२, रा. बंगाली फाईल) हा चिलीमद्वारे गांजा सेवन करताना आढळला. तर नईमअली अशपाक अली (वय २५, रा. गांधलीपुरा) हा तरुण इंदिरा भवनच्या मागील बाजूस गांजा सेवन करताना आढळला. या चारही तरुणांकडून चिलीम आणि गांजा जप्त करून त्यांच्यावर गुन्हादाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धाडसत्रामुळे गंजोड्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, शेतकी संघ जीन, बसस्टँड मागे, अंबाऋषी टेकडी, चोपडा रोड उड्डाण पूल, दाजीबा नगरजवळील मैदान आदी विविध ठिकाणीही काही तरुण गांजा सेवन करत असल्याची ओरड असून त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026

    जळगावातील स्टेडीयम परिसरात दुकानात चोरी : रोकड लंपास !

    March 13, 2026

    जम्मूमध्ये मोठा अनर्थ टळला : फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.