Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जुन्या वादातून प्रौढावर हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक
    क्राईम

    जुन्या वादातून प्रौढावर हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक

    editor deskBy editor deskMarch 12, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जुन्या वादातून रसाल गमन राठोड (वय ४८, रा. जुना आसोदा रोड) यांना पाच जणांनी दारुच्या नशेत असतांना मारहाण केली. ही घटना दि. १० मार्च रोजी स्मशानभूमी परिसरात घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  जुन्या वादातून पाच जण सुनील रसाल राठोड याला शोधत होते. त्या वेळी त्याचे वडील रसाल राठोड हे दिसल्याने त्यांना एका जणाने ‘तुझा मुलगा सुनील कोठे आहे, आज मी त्याला मारुन टाकेल’, असे म्हणत धमकी दिली. तसेच पाच जणांनी मारहाण केली. या प्रकरणी रसाल राठोड यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या हिमांशू नवीन साखला, प्रशांत उर्फ गौरव गोपाल चौधरी, अक्षय विलास तायडे (तिघ रा. कासमवाडी), कृष्णा नंदू सुर्यवंशी (रा. पिवळ्या भिंतीजवळ) व अन्य एक संशयित अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय खैरे करीत आहेत.

    प्रौढाला मारहाण केल्यानंतर चार जणांपैकी दोघांना यापुर्वीच अटक करण्यात आली होती. तर उर्वरीत दोघ हे पसार झाले होते. शनिपेठ पोलिसांनी तपासचक्रे फिरवित संशयित अक्षय विलास तायडे व कृष्णा नंदू सूर्यवंशी या दोघांना बुधवारी अटक केली असून उर्वरीत एक संशयित मात्र अद्याप फरार आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मुंबई विधानभवनात सुरक्षिततेसह खळबळ; ई-मेलद्वारे धमकी आल्याने सतर्कता

    March 12, 2026

    बाथरूममध्ये करंटचा धक्का; ४४ वर्षीय कारागिराचा मृत्यू

    March 12, 2026

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.