Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खर्गे आणि सपकाळ यांना फडणवीसांचा बिनडोक टोला !
    राजकारण

    खर्गे आणि सपकाळ यांना फडणवीसांचा बिनडोक टोला !

    editor deskBy editor deskMarch 9, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे गुलाम” असल्याचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. फडणवीस म्हणाले, “ज्यांचे संपूर्ण आयुष्य एका परिवाराच्या गुलामीत गेले, त्यांनी देशाला सार्वभौम कसे ठेवतात आणि देश चालवतात, हे आम्हाला शिकवू नये.”

    त्यांनी पुढे स्पष्ट केले की, पंतप्रधान मोदींनी भारताची ऊर्जा सुरक्षित ठेवली आहे. “आज टॅरिफ वॉर झाला तरी भारत झुकला नाही, वेगवेगळ्या देशांशी टॅरिफ करार करून भारताने मजबुती दाखवली,” असेही फडणवीस यांनी सांगितले.

    गडचिरोलीतील लोखंड प्रकरणावरही मुख्यमंत्री आक्रमक झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गडचिरोलीचे लोखंड परदेशातून पाठवून पुन्हा विकत घेण्याचा आरोप केला होता. यावर फडणवीस म्हणाले, “कोणी लॉजिकली बोलले तर उत्तर दिले पाहिजे, पण ‘बिनडोक’ बोलल्यावर मी देखील बिनडोक ठरेन.”

    याशिवाय, फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली, ज्यावर विरोधकांनी ती फसवणूक असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी नाही, तर जिंकल्यानंतर कर्जमाफी केली आहे. जनता आमच्यावर विश्वास ठेवते, विरोधकांनी कितीही आंदोलने केली तरी जनतेने त्यांना स्थान दिलेले नाही.” फडणवीसांच्या या आक्रमक भाषणाने राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, विरोधकांसमोर त्यांची ताकद स्पष्ट झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026

    भारत-अमेरिका व्यापार करारावरून काँग्रेस आक्रमक; शेतकरी संघर्ष पदयात्रा

    March 9, 2026

    इंधन तुटवड्याच्या अफवा पसरवू नका; राज्यात पुरेसा साठा – फडणवीस

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.