Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बसस्थानकावर पोलिसाचा धिंगाणा; शासकीय कामात अडथळा, चालकाला मारहाण
    क्राईम

    बसस्थानकावर पोलिसाचा धिंगाणा; शासकीय कामात अडथळा, चालकाला मारहाण

    editor deskBy editor deskMarch 5, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहिल्यानगर :  वृत्तसंस्था 

    अहिल्यानगर येथे प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलने गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने बसमध्ये धिंगाणा घालून चालक आणि वाहकाला मारहाण केली. यावेळी आरोपीने “मी पोलिस आहे, तुमच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करेल” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना बसस्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.25 वाजता उदगीर आगाराची (जि. लातूर) एमएच 24 ए.क्यु 7970 क्रमांकाची बस राहता बसस्थानकात आली. बसवाहक बालाजी पंडितराव बोरगावकर यांनी तक्रार नोंदवली की, येवला शहरात नेमणूक असलेले पोलिस कॉन्स्टेबल फकिरा तोताराम थोरात यांनी दारूच्या नशेत बसमध्ये धिंगाणा घालून चालक विकास बालाजी मुंडे यांच्यावर हल्ला केला.

    आरोपीने या धिंगाण्यात थांबण्याऐवजी काही साथीदारांना बोलावून चालकावर हल्ला सुरू ठेवला आणि त्याचा गणवेश फाडला. शिवीगाळ करत “मी पोलिस आहे, तुमच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करेल” अशी धमकी दिल्याचे देखील तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेमुळे काही काळासाठी बसस्थानकावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

    राहाता पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फकिरा थोरात, सार्थक बनसोडे (रा. साकुरी) व अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजि. नं. 64/2026 अंतर्गत बीएनएस कलम 132, 121(1), 351(2), 352 आणि 3(5) नुसार कारवाई केली जात आहे. पोलिस उपनिरीक्षक कोमल कुमावत यांच्याकडे प्रकरणाचा सखोल तपास सोपवण्यात आला असून तांत्रिक व प्रत्यक्ष पुराव्यांची पडताळणी सुरू आहे.

    कायद्याचे रक्षकच जेव्हा कायद्याचे उल्लंघन करून शासकीय कामात अडथळा निर्माण करतात, तेव्हा सर्वसामान्यांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचे, असा संतप्त सवाल या घटनेने उपस्थित केला आहे. पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा तडा लागल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून दोषींवर नेमकी किती कठोर कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नातवावर आजीची क्रूरता ; रंग उडवला म्हणून उकळते पाणी ओतले !

    March 5, 2026

    सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे खळबळ

    March 5, 2026

    आव्हाने येथील युवकाचा गिरणा नदीपात्रात बुडून अंत

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.