Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गॅस गळतीमुळे भीषण आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली !
    क्राईम

    गॅस गळतीमुळे भीषण आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली !

    editor deskBy editor deskMarch 5, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील जाम मोहल्ला परिसरातील एका दुकानात सिलिंडरला गळती लागल्यामुळे याचा मोठा भडका उडाला. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पळापळ झाली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र लाखोंचे नुकसान झाले. ही घटना सोमवार, २ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार,  जाम मोहल्ला परिसरामध्ये संध्याकाळी पाच वाजेनंतर रोजा इफ्तारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, त्याचवेळी एका हॉटेलात गॅसला गळती सुरू झाली. त्यामुळे मोठा भडका उडाला व आगीने रौद्ररूप धारण केले. बाजूला असलेल्या हॉटेलला आगीच्या झळा बसल्या. यात मोठे नुकसानही झाले. पालिकेच्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे विवेक माकोडे यांच्या सहकर्मचाऱ्यांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवले. नगराध्यक्ष गायत्री भंगाळे व नगरसेवक सचिन चौधरी यांनीही घटनास्थळी पोहोचून नुकसान झालेल्या व्यावसायिकांची त्वरित नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले. नगरसेवक आसीफ खान इक्बाल खान, जुनेद अशरफ खान तसेच नगरसेवक पिंटू कोठारी यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचत नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे जळगावात आयोजन; राज्यभरातील खेळाडूंची उपस्थिती !

    June 13, 2026

    देशाला हादरवणारी दुर्घटना! हवाई दलाचे विमान कोसळले, पाच वीर जवान शहीद

    June 13, 2026

    चेंदामेंदा झालेल्या ट्रकमधून चालकाला मृत्यूच्या दाढेतून खेचले बाहेर

    June 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.