Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘लाडकी बहीण’ सुरूच राहणार; वन खात्यासाठी ६ हजार कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव
    राजकारण

    ‘लाडकी बहीण’ सुरूच राहणार; वन खात्यासाठी ६ हजार कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव

    editor deskBy editor deskFebruary 27, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    विधानपरिषदेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी धनगरवाडे व आदिवासी पाड्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले असता, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उत्तराने सभागृहात चर्चा रंगली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण येत असला तरी योजना बंद होणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी वन खात्यासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव मांडल्याचे सांगितले.

    कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा भागातील अनेक धनगरवाडे जंगल परिसरात असल्याचे सतेज पाटील यांनी नमूद केले. गावांना सिमेंट काँक्रिट रस्त्यांनी जोडण्याच्या घोषणांप्रमाणे धनगरवाड्यांसाठी विशेष मोहीम राबवली जाईल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अलीकडेच एका रुग्णाला तीन किलोमीटर खांद्यावरून नेण्याची वेळ आल्याची घटना त्यांनी सभागृहात मांडत वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

    यावर उत्तर देताना गणेश नाईक यांनी वनविकास महामंडळाच्या माध्यमातून झालेल्या साग लागवडीचा उल्लेख केला. सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या साग संपत्तीच्या आधारे सुमारे ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. झाडांच्या विरळणीमधून मिळणाऱ्या लाकडाच्या उत्पन्नातून कर्जावरील व्याज फेडता येईल, असा त्यांचा दावा होता.

    या निधीमुळे वन खात्याच्या प्रलंबित प्रश्नांना दिलासा मिळेल, हिरवे डोंगर, पर्यटन विकास, क्षेत्रीय व विभागीय कार्यालयांची उभारणी तसेच वन कर्मचाऱ्यांच्या वेतनातील सुधारणा करता येतील, असे नाईक यांनी स्पष्ट केले. ठोक पगाराऐवजी मूळ वेतन व भत्त्यांची तरतूद करण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे.

    वनक्षेत्रातील वाड्या-वस्त्यांचे स्थलांतर, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना आणि पर्यायी उपजीविकेची व्यवस्था यासाठीही निधीचा वापर होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. धनगरवाड्यांच्या रस्त्यांसाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देत त्यांनी चर्चेचा समारोप केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026

    विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा आघाडीचा एकमुखी पाठिंबा; सुप्रिया सुळे यांच्या ट्विटने राजकारणात नवा रंग !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.