Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाकोद परिसरातील महामार्गावर भरधाव ट्रक पलटला !
    जळगाव

    वाकोद परिसरातील महामार्गावर भरधाव ट्रक पलटला !

    editor deskBy editor deskFebruary 25, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाकोद बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. इंदूरहून हुबळीकडे औषधी माल घेऊन जाणारा ट्रक साईडपट्ट्यांना भराव नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात ट्रकचालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले असून ट्रक व औषधी मालाचे मोठे नुकसान झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आरजे ०९ जीसी १९७५ क्रमांकाचा ट्रक ग्लुकोज पावडर, सलाईन व इतर औषधे घेऊन पहाटेच्या सुमारास वाकोद परिसरातून जात होता. महामार्गालगतच्या साईडपट्ट्यांमध्ये खोदकाम करून भराव न टाकल्याने रस्त्याच्या कडेला मोठी खोल जागा निर्माण झाली आहे. वाहन चालविताना ट्रकचा ताबा सुटून तो या खड्ड्यात जाऊन पलटी झाला.

    अपघातात चालक व क्लिनरला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

    दरम्यान, जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. मागील दोन महिन्यांपासून तयार झालेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साईडपट्ट्या खोदून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामध्ये भराव न टाकता त्या उघड्याच सोडल्याने वाहनधारकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची व पादचाऱ्यांची वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

    स्थानिक नागरिकांकडून संबंधित विभागाने तातडीने साईडपट्ट्यांना भराव टाकून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत राजकीय रणसंग्राम

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.