Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले
    क्राईम

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 17, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव शहरातील Deokar College of Pharmacy येथे शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय श्याम प्रभाकर पाटील या विद्यार्थ्याच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. कॉलेजमध्ये कथित मारहाण आणि सार्वजनिक अपमान झाल्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.


    मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी कॉलेजचे प्राचार्य योगेश पवार यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर पीव्हीसी पाईपने मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेमुळे श्याम मानसिकदृष्ट्या खचला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.


    १४ फेब्रुवारी रोजी श्यामने आपल्या वडिलांना आणि काकांना फोन करून आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर नेहरूनगर येथील राहत्या खोलीवर त्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून त्यामध्ये मारहाणीचा उल्लेख असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
    या प्रकरणी Ramanand Nagar Police Station येथे मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून प्राचार्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संबंधित प्राचार्यांचा शोध घेतला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    वेगवेगळ्या राज्यांचे पत्ते, पेमेंट रोखून फसवणूक; ‘रेझॉरपे’ व्यवहारातून प्रकार उघड

    April 12, 2026

    डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त जळगाव शहरात वाहतूक बदल !

    April 12, 2026

    भुसावळ विभागात ‘फोर्ट्रेस’ मोहीम; ६०१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई, ४.३० लाखांचा दंड वसूल

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.