Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी
    राजकारण

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    editor deskBy editor deskFebruary 16, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला वीस दिवस पूर्ण झाले तरी अपघातामागील कारणांबाबतचे गूढ कायम आहे. या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय व्यक्त करत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सरकारकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी ठोस प्रगती दिसून येत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.

    दरम्यान, अपघातामागील सत्य शोधण्यासाठी रोहित पवार सध्या दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. विमान अपघातासंदर्भातील तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी ते वैमानिक, निवृत्त अधिकारी आणि हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भेटी घेत आहेत. उड्डाणापूर्वीची तपासणी, हवामानस्थिती, यंत्रणांची कार्यक्षमता, वैमानिकांचा अनुभव तसेच नियमांचे पालन झाले होते का, या सर्व बाबींचा ते अभ्यास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    अधिकृत चौकशी अहवाल जाहीर होण्यास विलंब होत असल्याने रोहित पवार यांनी स्वतंत्र पातळीवर माहिती संकलन सुरू केले आहे. अपघातातील प्रत्येक पैलूची छाननी व्हावी आणि कोणतीही बाब दडपली जाऊ नये, यासाठी त्यांनी खासगी गुप्तहेरांची मदत घेतल्याची चर्चा आहे. अधिकृत अहवालास वेळ लागू शकतो, असे संबंधित अधिकाऱ्यांचे मत असले तरी सत्य लवकर समोर यावे, अशी त्यांची मागणी आहे.

    दरम्यान, या प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय कडून अद्याप प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे. तसेच संबंधित विमान कंपनी ‘व्हीएसआर’विरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन झाले का, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी समाज माध्यमांद्वारे केली आहे.

    ही दुर्घटना २८ जानेवारी रोजी घडली. अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी त्यांचे भाडेतत्त्वावरील विमान मुंबईहून उड्डाण झाले. सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास बारामती परिसरात पोहोचल्यावर धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच विमान बाजूच्या शेतात कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाचा स्फोट झाला आणि या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर राज्यभरात शोककळा पसरली असताना आता या अपघातामागील कारणांचा उलगडा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिकृत अहवाल आणि स्वतंत्र चौकशी यांमुळे सत्य समोर येईल का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026

    शिंदे गटाचा खुला इशारा: “माझ्या नादी लागू नका, ठाणे-कल्याण लोकसभेत उभा राहा”

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.