Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पुण्यात भाजप-काँग्रेसमध्ये दगडफेक : २ जखमी
    क्राईम

    पुण्यात भाजप-काँग्रेसमध्ये दगडफेक : २ जखमी

    editor deskBy editor deskFebruary 15, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली असल्याच्या विधानावरून रविवारसकाळी पुण्यात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रस्त्यावर संघर्ष झाला. दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली, ज्यात काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी झाले.

    घटनेनंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि पुढील अनर्थ टळला. या राडीत काही वाहनांचे नुकसान झाले, तर महिला पोलिसाही जखमी झाली. काँग्रेसने भाजपवर पोलिसांच्या पाठिंब्याने हल्ल्याचा आरोप केला आहे, तर भाजपने सपकाळच्या विधानावर टीका केली आहे. या प्रकरणी पुण्यात एका गुन्ह्याची नोंद झाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

    दोन्ही पक्षांच्या तर्कानुसार, आंदोलनाची सुरुवात भाजपने केली होती, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. पोलिसांनी घटनास्थळी तगडा बंदोबस्त ठेवला आहे आणि परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “शिवरायांच्या नावावर राजकारण थांबवा” : सपकाळांचा भाजपला थेट इशारा

    February 15, 2026

    गॅस सिलिंडरचा स्फोट : तीन परिवाराचा संसार जळून खाक !

    February 15, 2026

    महाशिवरात्री उत्सवात महाराष्ट्र न्हाऊन निघाला; ज्योतिर्लिंगांवर भक्तांची महासागरासारखी गर्दी

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.