Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संजय राऊतांचा दावा: विधानसभा अध्यक्षांसोबत हाणामारी? व्हिडिओमुळे खळबळ
    राजकारण

    संजय राऊतांचा दावा: विधानसभा अध्यक्षांसोबत हाणामारी? व्हिडिओमुळे खळबळ

    editor deskBy editor deskFebruary 14, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या  पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत हाणामारी झाल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या ट्विटमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

    ‘ब्रेकिंग’ असा उल्लेख करत राऊत यांनी त्यांच्या अधिकृत खात्यावर व्हिडिओ पोस्ट केला. “विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे. तुम्ही सांगताय की मी सांगू?” असा थेट सवाल त्यांनी केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस  आणि पंतप्रधान मोदी यांनाही टॅग केले आहे.

    व्हिडिओत नेमके काय?

    शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक पुरुष हे राहुल नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालताना दिसत आहेत. घटनास्थळी उपस्थित काहीजण मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतानाही दिसतात. संबंधित महिला एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचे दृश्य दिसते. मात्र, राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार स्वतः नार्वेकरांशी धक्काबुक्की झाल्याचे स्पष्टपणे या व्हिडिओत दिसत नाही.

    हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, तो कोणत्या ठिकाणी चित्रित करण्यात आला आहे आणि त्यामागील पार्श्वभूमी काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

    या व्हिडिओबाबत विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सत्ताधारी पक्षाकडूनही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, संजय राऊत यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या नव्या फेरीला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सोशल मीडियावर या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहींनी राऊत यांच्या दाव्याचे समर्थन केले आहे, तर काहींनी व्हिडिओची सत्यता आणि संदर्भ स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. राज्यातील आधीच तापलेल्या राजकीय वातावरणात या प्रकरणामुळे नवे वादळ उठण्याची चिन्हे दिसत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दरमहा २० लाखांची कमाई करणारा बैल; २१ कोटींचा ‘कुबेर’ चर्चेत

    February 14, 2026

    ‘रोज विलीनीकरण’ थांबवा, प्राधान्य सुनेत्रा पवार स्थिर होणे – छगन भुजबळ

    February 14, 2026

    आमदाराच्या संपर्क कार्यालयात संशयास्पद बॅग; पोलिसांनी ताब्यात घेतले एअरगन

    February 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.