Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घर घेण्यासाठी विवाहितेचा तीन लाखांसाठी छळ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
    क्राईम

    घर घेण्यासाठी विवाहितेचा तीन लाखांसाठी छळ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 16, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या विवाहितेला घर घेण्याकामी माहेरहून ३ लाख रूपये आणावे यासाठी मारहाण व छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहीर असलेल्या रूपाली प्रशांत पाटील (वय-२४) विवाह चोपडा तालुक्यातील तावसे खुर्द येथील प्रशांत जगन्नाथ पाटील यांच्याशी २ जोनवारी २०१८ रोजी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती प्रशांत पाटील यांनी पुण्यात घर घेण्यासाठी ३ लाख रुपये माहेरहुन आणावे यासाठी अशी मागणी केली. परंतु विवाहितेने पैसे न आणल्याने रागातून पतीने तिला मारहाण करून छळ करण्यास सुरूवात केली. पैशांसाठी तिचे सासू, जेठ आणि जेठाणी यांनी देखील पैशांची मागणी केली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी रामेश्वर कॉलनी निघून आल्या. त्यानंतर शुक्रवारी १५ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती प्रशांत जगन्नाथ पाटील, सासू निलाबाई जगन्नाथ पाटील, जेठ वसंत जगन्नाथ पाटील आणि जेठाणी पूनम वसंत पाटील सर्व रा. तावसे खुर्द ता.चोपडा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.