Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाळूचा डंपर सोडण्यासाठी ३० हजारांची लाच; जळगावात तलाठी-मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात अटक
    जळगाव

    वाळूचा डंपर सोडण्यासाठी ३० हजारांची लाच; जळगावात तलाठी-मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 12, 2026Updated:February 12, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; ममुराबाद-म्हसावद परिसरात खळबळ


    जळगाव प्रतिनिधी : वाळू वाहतूक करणारा डंपर कारवाई न करता सोडून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद येथील तलाठी आणि म्हसावद येथील मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई दि. ११ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरात सापळा रचून करण्यात आली.


    या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या लोकसेवकांमध्ये सदानंद व्यंकटी मुंडे (वय ३४), तलाठी, सजा ममुराबाद (वर्ग-३) आणि अभिजित नामदेव येवले (वय ३९), मंडळ अधिकारी, सजा म्हसावद (वर्ग-३) यांचा समावेश आहे.


    डंपर पकडला… आणि फोनवरून सुटला


    तक्रारदार हे वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. दि. ४ फेब्रुवारी रोजी रात्री गस्तीवर असताना तलाठी सदानंद मुंडे यांनी वाळूने भरलेला डंपर पकडला होता. मात्र, मंडळ अधिकारी अभिजित येवले यांनी फोनवरून दिलेल्या सूचनेनुसार तो डंपर कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आल्याचे समोर आले.


    यानंतर या ‘उपकारा’च्या बदल्यात आणि पुढील कारवाई टाळण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांनी मिळून तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी, जळगाव येथे तक्रार दाखल केली.


    तडजोडीअंती ३० हजारांवर सौदा


    एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने जुने जळगाव परिसरातील अभिजित येवले यांच्या घरातील खाजगी कार्यालयात सापळा रचला. यावेळी तलाठी सदानंद मुंडे यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.


    रोख रक्कम व मोबाईल जप्त
    झडतीदरम्यान सदानंद मुंडे यांच्याकडून ४०,२०० रुपये रोख व विवो कंपनीचा मोबाईल, तर अभिजित येवले यांच्याकडून ७,६०० रुपये रोख व विवो कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


    भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
    या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


    सापळा पथकात योगेश ठाकूर (पोलीस उपअधीक्षक), तपास अधिकारी स्मिता नवघरे (पोलीस निरीक्षक), रेश्मा अवतारे, सुरेश पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, प्रदीप पोळ आणि चंद्रशेखर चौधरी यांचा समावेश होता.


    लाच मागितल्यास तक्रार करा
    कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी त्वरित टोल-फ्री क्रमांक १०६४ किंवा जळगाव एसीबी कार्यालयाच्या ०२५७-२२३५४७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बारामती विमान दुर्घटनेला घातपाताचा रंग? पिंकी माळींच्या वडिलांचा खळबळजनक दावा

    February 11, 2026

    पैशांच्या कारणावरून भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला

    February 11, 2026

    पैशांच्या वादातून भावावर लोखंडी पाईपने हल्ला

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.