Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेगाव नगरी भक्तिमय; गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्साह शिगेला
    राजकारण

    शेगाव नगरी भक्तिमय; गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्साह शिगेला

    editor deskBy editor deskFebruary 8, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेगाव :  वृत्तसंस्था 

    संत श्री गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगाव नगरीत भक्तीचा अक्षरशः महासागर लोटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भजनी दिंड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, आतापर्यंत ७५० हून अधिक दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. दिंड्या येण्याचा ओघ अद्याप सुरूच असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    मागील वर्षी २०२५ मध्ये श्रींच्या १४७ व्या प्रकट दिनानिमित्त सुमारे ७०० भजनी दिंड्यांनी शेगाव गाठले होते. मात्र यंदा ७ फेब्रुवारीच्या सायंकाळपर्यंतच दिंड्यांची संख्या ७५० च्या पुढे गेली असून, भाविकांचा उत्साह दुपटीने वाढलेला दिसून येत आहे. गतवर्षी सुमारे १ लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले होते. यंदा दर्शनासाठी दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या जवळपास दुपटीने वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

    २ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या प्रकट दिन महोत्सवात दररोज काकडा, भजन, प्रवचन, हरिपाठ व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शनिवार (दि. ८) रोजी दुपारी १२ वाजता मुख्य प्रकट दिन सोहळा होणार असून, सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत दर्शनासाठी भाविकांची सर्वाधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. यानुसार प्रशासन व संस्थानकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

    दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता शेगावातील भक्तनिवास व्यवस्था सध्या पूर्णतः भरलेली आहे. संस्थानचे आनंद विहार, विसावा तसेच इतर मोठे भक्तनिवास हाऊसफुल्ल झाले असून, मुक्कामासाठी जागा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक भाविकांनी पर्यायी निवासस्थाने शोधण्यास सुरुवात केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.