Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ई-केवायसी दुरुस्तीला हिरवा कंदील; लाडक्या बहिणींचा मार्ग मोकळा
    राजकारण

    ई-केवायसी दुरुस्तीला हिरवा कंदील; लाडक्या बहिणींचा मार्ग मोकळा

    editor deskBy editor deskFebruary 6, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील अनेक पात्र महिलांना हप्ता न मिळाल्याने निर्माण झालेल्या असंतोषानंतर अखेर शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाने ई-केवायसी दुरुस्तीचे पोर्टल पुन्हा सुरू केले असून लाभार्थी महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन दुरुस्ती करता येणार आहे.

    गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने हजारो महिलांचे अनुदान थकले होते. यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये लाडक्या बहिणींनी मोर्चे काढून आक्रोश व्यक्त केला होता. या आंदोलनांची गंभीर दखल घेत महिला व बालविकास विभागाने आदेश काढून ई-केवायसी पोर्टल पुन्हा कार्यान्वित केले आहे.

    ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसीद्वारे आधार प्रमाणीकरण पूर्ण केले होते. मात्र, ही प्रक्रिया करताना कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत आहे किंवा निवृत्तीवेतनधारक आहे का, या प्रश्नाबाबत अनेक महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याचे आढळून आले. या तांत्रिक चुकांमुळे अनेक पात्र महिलांच्या अर्जांबाबत संभ्रम निर्माण झाला आणि त्यांचे पैसे रोखले गेले.

    या त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने 20 जानेवारी रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, प्रत्यक्ष तपासणी प्रक्रियेमुळे वेळेचा अपव्यय होत असल्याने आणि अडचणी वाढत असल्याने महिलांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून ऑनलाईन दुरुस्तीची मागणी सातत्याने केली जात होती.

    या पार्श्वभूमीवर शासनाने ई-केवायसी प्रक्रियेत सुधारणा करण्याची एकदाची संधी उपलब्ध करून दिली आहे. ज्या महिलांनी माहिती भरताना चुकीचा पर्याय निवडला होता, त्या आता आपला अर्ज ऑनलाईन दुरुस्त करू शकणार आहेत. दुरुस्तीची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आल्याने हजारो लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    इस्लामाबादमध्ये नमाजवेळी मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; 50 ठार, 70 हून अधिक जखमी

    February 6, 2026

    जळगावसह ७ महानगरपालिकेत भाजपचे महापौर !

    February 6, 2026

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.