Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विधानसभा निवडणुकीतील बंडखोर प्रभाकर अप्पा सोनवणे यांचा मध्यरात्री भाजपात जाहीर प्रवेश
    जळगाव

    विधानसभा निवडणुकीतील बंडखोर प्रभाकर अप्पा सोनवणे यांचा मध्यरात्री भाजपात जाहीर प्रवेश

    editor deskBy editor deskJanuary 7, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रवीण पाटील 

    जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडीत माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

    सन 2019 व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करूनही भाजपाने त्यांना मध्यरात्री प्रवेश दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेला आहे निष्ठावंतांना पुन्हा एक धक्का दिला जात आहे या प्रवेशामुळे.

    या प्रवेशप्रसंगी राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मा. ना. गिरीष भाऊ महाजन, मंत्री संजय सावकारे, आमदार राजुमामा भोळे आणि आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या राजकीय इतिहास पाहता सुरेश दादा जैन यांच्या माध्यमातून राजकीय प्रवेश तसेच कानळदा भोकर गटातून जिल्हा परिषद मध्ये भाजपा कडून उमेदवारी त्यानंतर बाजार समितीत भाजपाच्या पॅनल करून उमेदवारी असा सर्व इतिहास असताना भाजपातून फुटून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत चोपडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी महायुतीची बंडखोरी केली.

    त्यानंतर आत्ता मनपाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल परंतु उमेदवारी मिळाली नाही असे असताना भाजपाला दगाफटका देऊन तसेच महायुतीशी गद्दारी करून विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला भाजपाने मध्यरात्री प्रवेश देण्याचे कारण काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये उपस्थित होत आहे.

    तसेच आता म्हसावद बोरणार गटातून शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार पवन सोनवणे यांच्याविरुद्ध भाजपा कडून निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणजे या ठिकाणी महायुती धर्म पाळला जाईल असे चित्र दिसत नाही असो भाजपामध्ये पायघड्या टाकत हा प्रवेश झाला असल्याचे वृत्त आहे.

    भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर म्हसावद बोरणार करण्यातून इच्छुक आहेत मग आता उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागून आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बाथरूममध्ये करंटचा धक्का; ४४ वर्षीय कारागिराचा मृत्यू

    March 12, 2026

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026

    जुन्या वादातून प्रौढावर हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.