जळगाव : प्रतिनिधी
कळंब येथील जगदंबा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च चे प्राचार्य प्रा. डॉ. राहुल बिजवार यांना नुकतीच इंदोर येथील ओरिएंटल विद्यापीठातर्फे पीएच.डी प्रदान करण्यात आली. त्यांनी औषधनिर्माण या शाखेतून ‘फॉर्मुलेशन अँड इव्हाल्युएशन ऑफ पोलीमेरिक ड्रग डिलिव्हरी सिस्टिम ऑफ अँटी-मलेरिअल ड्रग फॉर पेडियाट्रीक यूझ’ याविषयावर आपले शोधप्रबंध सादर केले. त्यांना जळगाव येथील प्रा. डॉ. हर्षल तारे यांचे मार्गदर्शन लाभले. पीएच.डी पदवी प्रदान झाल्याने त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
आपल्या संशोधन कार्यकाळात त्यांनी ७ पुस्तके, ७० शोधनिबंध आणि ११ पेटंट्स प्रकाशित केले. संशोधन क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले. पीएच.डी कार्यकाळात केलेल्या सखोल संशोधनाबद्दल ओरिएंटल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. अमोल गोरे, प्र कुलगुरु प्रा. डॉ. ध्रुव घई, कुलसचिव प्रा. डॉ. अजयेंद्र नाथ, रिसर्च डीन प्रा. डॉ. धीरज नीम, असोसिएट डीन प्रा. डॉ. क्रतिका डॅनियल, फार्मसी प्रमुख प्रा. डॉ. सुधा वेंगुर्लेकर, प्रा. डॉ. सचिन कुमार जैन, जगदंबा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च चे सचिव डॉ. शितल वातिले व तसेच संचालक श्री पवन वातिले यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रातील पुढील संशोधनास शुभेच्छा दिल्या.



