विजय पाटील जळगाव : भाजपात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एकालाच उमेदवारी मिळणार आहे इतर इच्छुक विरोधकांना मिळू नये तसेच निवडणुकीतून बाद व्हावे यासाठी जे इच्छुक आहेत त्यांना फॉर्म भरण्यास भाजपा कडून सांगण्यात आले.
उद्या एबी फॉर्म ज्याला द्यायचा त्याला दिला जाईल अशी नामी शक्कल लढून भाजपाने नवी खेडी-खेळत दोंडाईचा पॅटर्न राबवण्याचे जळगावत षड्यंत्र आहे.
भाजपातील इच्छुक उमेदवार शिवसेना ठाकरे गटाला व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळू नये यासाठी जे इच्छुक आहेत त्यांना पक्षाचा फॉर्म भरण्याची सूचना करण्यात आली आहे.
छाननी च्या दिवशी आपोआपच उमेदवारी अर्ज ए बी फार्म नसल्यामुळे बाद होईल म्हणजेच इच्छुक बंडोखरला कुठली संधी राहणार नाही अशा पद्धतीने रणनीती आखली गेली आहे.
दोंडाईचा नगरपालिकेत देखील भाजपाने अशाच पद्धतीने खेळी करून भाजपाचे इच्छुक उमेदवार बाद केले होते त्यांना कुठलीही संधी इतर पक्षात जाण्यास मिळू दिली नाही हीच राजकीय रणनीती भाजपाकडून केली जाणार असून जळगाव महापालिकेत ही रणनीती कितपत यशस्वी होते हे उद्या समजेल.



