Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नागपुरात काळजाचा ठाव घेणारी घटना; नरसाळा घाटामागे चिमुकलीचा लचके तोडलेला मृतदेह”
    क्राईम

    नागपुरात काळजाचा ठाव घेणारी घटना; नरसाळा घाटामागे चिमुकलीचा लचके तोडलेला मृतदेह”

    editor deskBy editor deskDecember 27, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था

    नरसाळा घाटाच्या मागील परिसरात एका चिमुकलीचा अत्यंत विदारक अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने शनिवारी (दि. २७) सकाळी खळबळ उडाली. सुमारे ८ ते ९ महिन्यांच्या या मुलीचे शरीर लचके तोडलेल्या अवस्थेत आढळून आले असून, प्राथमिक तपासात वन्यप्राण्याच्या हल्ल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृत चिमुकलीचे नाव अनुष्का मेढा असे आहे.

    ही घटना उघडकीस येताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. खुल्या जागेत अर्धवट अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

    दरम्यान, गेल्या काही दिवसांत नागपूरच्या पारडी, दिघोरी, हुडकेश्वर, नरसाळा आदी शहरी भागांत बिबट्या किंवा इतर वन्यप्राणी दिसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मोकाट कुत्र्यांच्या शोधात वन्यप्राणी शहराच्या हद्दीत शिरल्याची शक्यता वनविभागाकडूनही वर्तवली जात आहे. त्यामुळे या चिमुकलीवर वन्यप्राण्याने हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, परिसरात गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. हुडकेश्वर पोलीस आणि वनविभाग संयुक्तपणे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    माजी मंत्री खडसे अडचणीत येणार ? सरकारने दिले एसआयटी चौकशीचे आदेश !

    March 11, 2026

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    १३ वर्षांपासून कोमात, गाझियाबादच्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक इच्छामृत्यू निर्णय

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.