Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आ.चव्हाणांची जादू चाळीसगावात चालली : थेट नगराध्यक्षपदी प्रतिभा चव्हाण !
    चाळीसगाव

    आ.चव्हाणांची जादू चाळीसगावात चालली : थेट नगराध्यक्षपदी प्रतिभा चव्हाण !

    editor deskBy editor deskDecember 22, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या चाळीसगाव नगरपालिकेवर भाजपने बहुमताचा झेंडा फडकविला असून, थेट नगराध्यक्षपदी प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी शहर विकास आघाडीच्या पद्मजा राजीव देशमुख यांचा ६०१२ मतांनी पराभव केला. एकूण ३६ पैकी भाजपने २४, शहर विकास आघाडी १०, तर दोन अपक्षांनाही कपाळी विजयाचा टिळा लागला.

    रविवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सकाळी १० वाजता अगोदर टपाली मतदानाची मोजणी झाली. एकूण १६ टेबलवर ७२ कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली.

    विजयानंतर जल्लोष करताना नगराध्यक्ष प्रतिभा चव्हाण आणि भाजपाच्या कार्यकर्त्यां. प्रतिभा चव्हाण यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेतली. मतमोजणीच्या एकूण नऊ फेऱ्या झाल्या. एका फेरीत दोन प्रभागांतील मतमोजणी झाली. नवव्या फेरी अखेर प्रतिभा चव्हाण यांना ३२२३८, तर शविआच्या पद्मजा देशमुख यांना २६२२६ मते आम आदमी पार्टीचे अँड. राहुल जाधव यांना ४३४, तर राष्ट्रवादीचे (अजित पवार) समाधान पाटील यांना ३५३ मते मिळाली.

    प्रभाग क्रमांक १ (अ): करणसिंग राजपूत (भाजप) २२४६, प्रभाग १ (ब): मनीषा पाटील (भाजप) २२६६, प्रभाग २ (अ): राहुल मस्के (शहर विकास आघाडी) १३८०, प्रभाग क्र. २ (ब): वैशाली मोरे (शहर विकास आघाडी) १५३७, प्रभाग ३ (अ) मधून दीपक पाटील (शहर विकास आघाडी) १२६१, प्रभाग ३ (ब): स्वाती शिरुडे (भाजप) १७१६, प्रभाग ४(अ) : हर्षल चौधरी (भाजप) २२८६, प्रभाग क्र. ४(ब): प्राजक्ता कोठावदे (भाजप) १८५७. प्रभाग ५ (अ): रूपाली चौधरी (भाजप) २६२०, प्रभाग ५ (ब): युवराज जाधव (भाजप) १७७८, प्रभाग ६(अ) योगेश खंडेलवाल (भाजप) १६३८, प्रभाग ६ (ब): योजना पाटील (भाजप) १४९०, प्रभाग ७ (अ) स्वाती राखुंडे (शहर विकास आघाडी) २०३५, प्रभाग ७(ब): राजेंद्र चौधरी (अपक्ष), १४२८. प्रभाग ८ (अ) पायल कारडा (भाजप) १०९६, प्रभाग ८ (ब) सोमसिंग राजपूत (भाजपा) १६७५. प्रभाग क्र. ९ (अ) विजया पवार (शहर विकास आघाडी) १४४२. प्रभाग २ (ब) पूनम अहिरे (शहर विकास आघाडी) १६४०, प्रभाग क्र. १० (अ): भारती मराठे (भाजपा) १५७२, प्रभाग १० (ब): संभाजी गवळी (भाजपा) १३६८, प्रभाग ११ (अ) हर्षदा बाळू पवार (भाजपा) १९१६. प्रभाग ११ (ब): अभय वाघ (भाजप) १४३७, प्रभाग १२ (अ) अनिल चौधरी (भाजपा) २०८१, प्रभाग १२ (ब) सायली जाधव (अपक्ष) २३६७, प्रभाग १३ (अ) फकिरा बेग जमाल बेग मिर्झा (भाजपा) २३५०, प्रभाग १३ (ब): मेघा चौधरी (भाजपा) १८९८, प्रभाग १४(अ): शेख इमरान शब्बीर (शहर विकास आघाडी) २००६, प्रभाग १४ (ब): रुचीना खान (भाजपा) १९६५. प्रभाग १५ (अ) शेख वसीम रज्जाक (भाजपा) १३१०, प्रभाग १५ (ब): नलिनी चौधरी (भाजपा) १६६४, प्रभाग १६ (अ): अभिषेक राजीव देशमुख (शहर विकास आघाडी) १८२१, प्रभाग १६(ब) मधून राजश्री राजपूत (शहर विकास आघाडी) १८०६, प्रभाग १७ (अ) उज्ज्वला राजपूत (भाजपा) १६३०, प्रभाग १७ (ब): प्रशांत कुमावत (भाजपा) २१०६, प्रभाग १८ (अ): धर्मा बच्चे (भाजपा) ७९२. प्रभाग १८ (ब) सविता ठाकूर (शहर विकास आघाडी) ११३६

    विजयी झालेल्या ३६ नगरसेवकांमध्ये ३० चेहरे नवखे असून, यात सर्वाधिक भाजपच्या उमेदवारांचा समावेश आहे. सहा माजी नगरसेवकांनी पुन्हा कमबॅक केले आहे. यात राजेंद्र चौधरी व सायली रोशन जाधव यांनी अपक्ष उमेदवारी करीत विजयश्री खेचून आणला. १३ माजी नगरसेवकांना मतदारांनी या निवडणुकीत नाकारले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महानगरपालिकांत राष्ट्रवादीचा महापौर बसवणार; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना लक्ष्य

    December 22, 2025

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025

    पारोळा तालुक्यात जाळपोळ; मुलीच्या नातेवाईकांचा संताप हिंसक वळणावर

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.