Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विटनेर गावाजवळ भरधाव मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
    क्राईम

    विटनेर गावाजवळ भरधाव मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 10, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव-प्रतिनिधी प्रविण पाटील। जळगाव तालुक्यातील विटनेर गावाजवळ भरधाव महिद्रा पिकअप मालवाहू गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दुपारी घडली.

    याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विटनेर गावापासून चार किलोमीटर अंतरावर नेरीकडून एरंडोलकडे जाणाऱ्या महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी (जीजे ०५ बीटी ६४८९) ने जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकी (एमएच २८ डब्ल्यू ९४४०) ला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी १० जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार साहेबराव चिमा शिंदे रा. चिंचखेडा ता. मोताळा जि. बुलढाणा हा तरूणाचा मृत्यू झाला. तर गाडीतील चालकासह इतर दोघे जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रूग्णवाहिकेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. महिंद्रा पिकअप गाडी हा रस्त्याच्या चारीत पडली.

    अपघात झाल्यानंतर विटनेरचे पोलीस पाटील साहेबराव धुमाळे यांच्यासह नागरीकांना घटनास्थळी धाव घेतली. अपघात घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आल्यानंतरही पोलीस कर्मचारी घटनास्थळी न आल्याने नागरीकांना आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान मयत तरूण हा कामानिमित्त साक्री (धुळे) येथील विजापूर येथे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. काम आटोपून पुन्हा दुचाकीने चिंचखेडा ता.मोताळा येथे आपल्या गावी परतीचा प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.