Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संतोष देशमुख खून प्रकरण : उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी !
    राजकारण

    संतोष देशमुख खून प्रकरण : उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी !

    editor deskBy editor deskDecember 19, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था

    जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असून सहकारी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून या सुनावणीच्या वेळी युक्तिवाद करण्यात आला. सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते. बीड न्यायालयात आज सकाळी 11 वाजता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली असून, सरकारी पक्षाच्या वतीने वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुरुवातीचा युक्तिवाद मांडला. मात्र त्यानंतर वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे कारण देत त्यांना या खटल्यातून बाजूला करावे, असा अर्ज न्यायालयात सादर केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

    संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी क्रमांक 2 विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. विष्णू चाटेचे सुरुवातीच्या दोन एफआयआरमध्ये नाव नाही तसेच या पूर्वी त्याच्यावर कोणता गुन्हा नसल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला. तर विष्णू चाटेकडून वारंवार आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी करण्यात आली असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वकिलांनी केला आहे. तसेच विष्णू चाटे हा सुरुवातीपासूनच गुन्ह्यात सक्रिय असल्याचे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

    सुनावणीदरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर झालेल्या आरोपांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. न्यायाधीशांनी अर्जाबाबत माहिती दिल्यानंतर, निकम यांनी आपले म्हणणे मांडत हा अर्ज फेटाळण्याची मागणी न्यायालयाकडे केली. याच दरम्यान, जेव्हा न्यायाधीशांनी सुदर्शन घुले या आरोपीचे नाव पुकारले, तेव्हा तो अचानक न्यायालयात चक्कर येऊन पडल्याने काही काळ गोंधळ उडाला. दुसऱ्या बाजूला, पुराव्यांच्या तांत्रिक मुद्द्यांवरून आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. घटनेचे व्हिडिओ आरोपींना आधी दिले जावेत आणि त्यानंतरच आरोप निश्चिती केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘जे व्हिडिओ ट्रायल कोर्टात नाहीत, ते उच्च न्यायालयात दाखवून वातावरण भावनिक केले जाते’ असा आक्षेपही आरोपींच्या वकिलांनी नोंदवला. यावर सरकारी पक्षाने आजच हे व्हिडिओ फाईल्स आरोपींच्या वकिलांना देण्याचे मान्य केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.