Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिवाजीनगरातील मोबाईल चोरट्याला अटक; एलसीबीची कारवाई
    क्राईम

    शिवाजीनगरातील मोबाईल चोरट्याला अटक; एलसीबीची कारवाई

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या शिवाजीनगर हुडकोतील तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे.

    युसूफ शेख ऊर्फ चिल्या इसा शेख रा. शिवाजी नगर हुडको, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात विविध ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरटयाचा शोध घेवून त्यास अटक करण्याच्या सुचना व आदेश दिले होते. शिवाजीनगर हुडकोतील संशयित युसूफ शेख ऊर्फ चिल्या हा मोबाईल चोरी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, राहूल पाटील यांच्या पथकाला सुचना केल्या. पथकाने शिवाजीनगर भागातून माहिती काढून संशयित युसुफ शेख यास अटक केली. दोन अल्पवयीन साथीदारांसोबत मोबाईल चोरीच्या गुन्हयाची संशयित युसूफ शेख याने कबूली दिली आहे. त्याच्याकडून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.