Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘लकी ड्रॉ’ लागल्याने अमिष दाखवत तरूणाची फसवणूक
    क्राईम

    ‘लकी ड्रॉ’ लागल्याने अमिष दाखवत तरूणाची फसवणूक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 2, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    जळगाव प्रतिनिधी: शहरातील एसएमआयडी महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या तरूणाला लकी ड्रॉ लागल्याचे सांगून ४३ हजार ४५० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत शुक्रवार १ जूलै रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, हेमंत गुलाब चौधरी (वय-३४) रा. एसएमआयटी महाविद्यालयाजवळ, जळगाव हा तरूण खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतो. गुरूवार २८ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हेमंत चौधरी हा तरूण घरी असतांना त्याच्या मोबाईलवर ९ लाख ५० हजार रूपये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचा मॅसेज आला. त्यावरून हेमंत चौधरी याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता समोरील अनोळखी व्यक्तीने तुम्हाला लकी ड्रॉ म्हणून ९ लाख ५० हजार रूपये जिंकले आहे असे सांगून जीएसटी म्हणून ९ हजार ५०० रूपये खात्यात जमा करावे लागेल असे सांगितले. त्यानुसार, हेमंतने गुगल पे वरून राहूल कुमार सॉ नामक व्यक्तीच्या खात्यान ९ हजार ५०० रूपये भले. त्यानंतर पुन्हा इनकम ट्रॅक्स म्हणून ३३ हजार ९५० रूपये सेंट करण्याचे सांगितले. त्यानुसार हेमंत चौधरी याने पुन्हा पैसे पाठविले. परंतू लकी ड्रॉ चे पैसे आले नाही. यावरून आपली ४३ हजार ४५० रूपयांची फसवणूक झाल्याचे समजल्याने त्यांनी शुक्रवार १ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश भावसार करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026

    ३२ वर्षीय तरुणाने घेतली तापी नदी पात्रात उडी !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.