Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची शक्यता
    राजकारण

    भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची शक्यता

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJune 30, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज;एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेविरोधात बंडखोरी केलेल्या आमदारांना सोबत घेऊन भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीला लागलीये. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाचं महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे यांनी सकाळी १० वाजता दोन ट्विट केले आहेत. या दोन ट्विटमध्ये शिंदे यांनी मंत्रिपदाच्या वाटपाबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केलं आहे.

    यावर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. शिंदे यांनी म्हटलं आहे की, भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

    एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस आहे, असं शिंदे यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.भाजपसोबत सरकार स्थापन करत असल्याचं अधोरेखित केलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.