Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ॲड. प्रकाश आंबेडकरांची शेतकऱ्यांचे कर्जमाफीवर आक्रमक पवित्रा !
    राजकारण

    ॲड. प्रकाश आंबेडकरांची शेतकऱ्यांचे कर्जमाफीवर आक्रमक पवित्रा !

    editor deskBy editor deskNovember 2, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    गेल्या काही दिवसापासून राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे सरकारने आत्ता मदत करावी यासाठी सर्वच विरोधक हल्लाबोल करीत असताना आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. अजित पवार यांनी केलेल्या “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” या विधानावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले की, “अजित पवारजी, तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का?”

    महाराष्ट्रातील शेतकरी आजही अवकाळी पावसामुळे, पिकांच्या नुकसानीमुळे आणि शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे मोठ्या अडचणीत आहेत. “हे शेतकरी कठोर परिश्रमाने अन्न पिकवतात, पण तुमचे सरकार त्यांच्या कष्टाची परतफेडही करू शकत नाही,” असे ते म्हणाले.

    सोयाबीनसाठी सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ५,३२८ रुपये असूनही शेतकऱ्यांना फक्त ३,५०० ते ४,००० रुपये भाव मिळत असल्याचा मुद्दा मांडत आंबेडकर म्हणाले की, “याचा अर्थ शेतकऱ्यांना जवळजवळ ३० टक्के तोटा सहन करावा लागत आहे. कापसाची स्थितीही तितकीच गंभीर आहे.”

    ते पुढे म्हणाले की, “अवकाळी पावसाने राज्यातील २९ जिल्ह्यांतील ६८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने मदत जाहीर केली असली तरी एक पैसाही शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेला नाही. शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली, आणि त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या.” सरकारच्या निष्क्रीय भूमिकेवर टीका करत आंबेडकर म्हणाले, “तुमच्या सरकारला शांत झोप मिळावी म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात का? शेतकऱ्यांना भिक नको, त्यांना त्यांचे हक्क हवेत!”

    वंचित बहुजन आघाडीने अजित पवार यांच्या शेतकरीविरोधी विधानाचा तीव्र निषेध नोंदवला असून, राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जम्मूमध्ये मोठा अनर्थ टळला : फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न

    March 12, 2026

    मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा ; “नवनिर्माण नावाला तरी साजेसे काम करा” !

    March 12, 2026

    भरधाव अर्टिगा कारने नागरिकांना उडवले; पाच जखमी, दोन नंबर प्लेटमुळे संशय वाढला

    March 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.